जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जळगाव जिल्हा दौरा शनिवार दिनांक २६ एप्रिल आणि रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी असून या दौऱ्यात ते मुक्ताईनगर येथे होणाऱ्या मंगल कलश यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
शनिवार, २६ एप्रिल रोजी रात्री ८:४५ वाजता राजधानी एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन करतील. त्यानंतर शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे रात्री ९ वाजता पोहोचून तेथे मुक्काम करतील.
रविवार, २७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता ते शासकीय वाहनाने मुक्ताईनगरकडे प्रयाण करतील. सकाळी ९:०० वाजता मुक्ताईनगर येथे होणाऱ्या मंगल कलश यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर दुपारी १२:४५ वाजता मुक्ताईनगरहून भुसावळ रेल्वे स्थानकाकडे प्रयाण करतील आणि दुपारी १:४५ वाजता भुसावळ स्थानकावरून पुष्पक एक्सप्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण करतील.
