Home » जळगाव » शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावरील ज्वारी मोजणी सुरू करा; भडगाव तहसीलदारांना निवेदन

शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावरील ज्वारी मोजणी सुरू करा; भडगाव तहसीलदारांना निवेदन

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भडगाव तालुक्यातील ज्वारी खरेदी विक्रीचे पोर्टल दि.२७ जून पासून बंद आहे. परिणामी शेतकरी वर्गास अनेक अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्वारी मोजणी भडगाव शेतकरी संघामार्फत केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ६६२ नोंदणी पैकी फक्त १८१ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी झाली, त्यानंतर काही नोंदणी ही झाली आहे. खरेदीचे उद्दिष्टे वाढले आहे परंतु खरेदीच बंद आहे, त्यामुळे ऐन पावसाळ्यात शेतकरी वर्गास आर्थिक अडचण सोबत मानसिक त्रास होत आहे.

दरम्यान शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता शिवसेना पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी आज भडगाव तहसील कार्यालयात तहसीलदार यांना याबाबत निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. यावेळी योजना पाटील, उपजिल्हाप्रमुख दिपक पाटील, मनोहर चौधरी, इसाक मलिक, जाकीर कुरेशी, इकबाल मण्यार, शेख अयास, शब्बीर खान, माधव जगताप, चेतन पाटील, चेतन रंगनाथ पाटील, संदिप ठाकरे, भुषण देवरे, देवेन धोबी, रोनित आहीरे, दिलीप शेंडे, दत्तू पाटील, नवल राजपूत इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!