Headlines
Home » क्राईम » धक्कादायक : गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघांचा खून

धक्कादायक : गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघांचा खून

सोलापूर | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सांगोला तालुक्यातील कोळा गावात काल रात्री दुचाकीला कट मारल्याने दोन गटात सशस्त्र हाणामारी होऊन त्यात दोघा तरूणांचा खून झाला. तर अन्य चौघे जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांच्या प्रत्येकी सहा-सहा अशा एकुण बारा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे.

बाळू शामराव आलदर (३०) आणि सूरज ऊर्फ बंड्या रमेश मोरे (२८) अशी खून झालेल्या दोघा तरूणांची नावे आहेत. यासंदर्भात कुंडलिक महादेव आलदर याने दिलेल्या फिर्यादीनुसार आदल्या दिवशी रात्री गावात दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून कुंडलिक आलदर याच्याशी सुजित चिवळा काटे व प्रीतेश गौतम काटे यांनी वाद घातला होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा याच क्षुल्लक कारणावरून जाब विचारल्याने पुन्हा भांडण झाले. त्यात कुंडलिक आलदर, त्याचे दोन चुलत भाऊ बाळू आलदर आणि चंदू आलदर यांना चाकूने भोसकण्यात आले. यापैकी बाळू आलदर याचा मृत्यू झाला. यानंतर बंड्या ऊर्फ सूरज मोरेचाही मृत्यू झाला. छोट्या ऊर्फ विनय विकास काटे, जयराम काटे, सुजित जयराम काटे, विकास मोरे व अभिमान तानाजी मोरे यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असुन पुढील तपास सूरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!