Headlines
Home » राजकीय » शिवसेना ठाकरे गटाची युवासेना कार्यकारिणी जाहीर ; रोशनी शिंदे युवासेनेच्या सहसचिव

शिवसेना ठाकरे गटाची युवासेना कार्यकारिणी जाहीर ; रोशनी शिंदे युवासेनेच्या सहसचिव

मुंबई | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची युवासेना कार्यकारिणी आज जाहीर झाली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये १२ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ठाण्याचे खासदार राजन विचारे, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या मुलींचा समावेश आहे. तसेच ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदे यांचीही कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांच्याकडे युवासेनेचे सहसचिव पद सोपविण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती जाहीर केल्याची माहिती आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!