कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : माध्यमिक शालांत परिक्षेचा इयत्ता १०वी चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कजगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाने झेंडा रोवला असून शाळेची १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. सर्व ३३ विद्यार्थी ८०% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
कु. ममता जगदीश परदेशी ही ९४.८०% मिळवून शाळेतुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. कु. अनुष्का उदय पाटील ही ९२.८०% मिळवून द्वितीय तर कु. दिपाली रविंद्र परदेशी ९१.८०% मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष सुनील चव्हाण व संस्थेचे सचिव नंदन चव्हाण, संस्थेचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे कजगाव परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
