Home » शैक्षणिक » केसीई अभियांत्रिकी व व्यवस्थापनाच्या ११ विद्यार्थ्यांची ट्रेनी ऑफिसर पदासाठी निवड

केसीई अभियांत्रिकी व व्यवस्थापनाच्या ११ विद्यार्थ्यांची ट्रेनी ऑफिसर पदासाठी निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाने एल अँड टी फायनान्स आणि एक्सलन्स एचआर यांच्या संयुक्त विद्यमानाने प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन केले होते. यात ट्रेनी ऑफिसर पदासाठी ११ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागातील जनरल मॅनेजमेंट, फिनटेक मॅनेजमेंट आणि ऍग्री बिजनेस मॅनेजमेंट या विभागातील विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या प्लेसमेंट ड्राइव्हच्या आयोजनासाठी एक्सलन्स एचआर या संस्थेचे व्यावसायिक भागीदार उमेश आटले व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. तसेच या ड्राइव्हसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान या ड्राइव्हमध्ये महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागातील चैताली कावळे, इशा जैस्वाल, कांचन पारवे, अथर्व पाटील, देवेंद्र पाटील, आकाश नागोरी, तेजस्विनी जैन, ज्ञानेश्वर चव्हाण, भूषण पाटील, राहुल जोशी, चैताली मराठे या ११ गुणवंत विद्यार्थ्यांची एल अँड टी फायनान्स या एमएनसी कंपनीकडून ट्रेनी ऑफिसर या पदासाठी निवड करण्यात आली.

ड्राइव्ह यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मुकेशकुमार तिवारी, व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रा. हर्षा देशमुख, प्रा. शेफाली अग्रवाल, प्रा. वीणा भोसले आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट कॉर्डीनेटर प्रा. हेमंत धनंधरे यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!