जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या पुढाकाराने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जळगाव लोकसभा संघटक करण पवार, माजी महापौर नितीन लढ्ढा, जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्यामकांत सोनवणे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी नगरसेविका ज्योती तायडे, बेबा सुरळकर, महिला आघाडी महानगरप्रमुख गायत्री सोनवणे तसेच सुभाष सांखला

तसेच पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या लोकोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
