Home » जळगाव » समूहगीत गायन स्पर्धेत आर.आर. विद्यालय प्रथम

समूहगीत गायन स्पर्धेत आर.आर. विद्यालय प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रोटरी क्लब ऑफ जळगाव आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा आज दि.१० शनिवार रोजी व.वा. वाचनालय जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या समूहगीत गायन स्पर्धेत जळगाव शहर व तालुक्यातील एकूण २३ शाळांनी सहभाग नोंदविला.

मोठ्या गटात आर.आर.विद्यालय, जळगाव यांच्या समूहाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संगीत शिक्षक संजय शिरसागर व संजय पिले यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!