जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासकीय विश्राम गृह जळगांव येथे राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आहे होते. सदर बैठकीसाठी राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पठारे यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झाली. बैठकीमध्ये उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून दीपक बळीराम सपकाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पठारे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री पसुपती पारस यांच्या कार्याचे सविस्तर वर्णन केले.

सदर विभागीय बैठकीला आनंद महिरे, रवींद्र सोनवणे, अशोक पारधे, सुरेश सोनवणे, श्रावण सपकाळे, निलेश भालेराव, राजू सोनवणे, आनंदा सोनवणे, श्रवण मोरे, कैलास पाटील, अण्णा सोनार, हाजी इकबाल बागवान, अस्लम शेख, भैया निकम, भीमराव निकम मंगेश जोशी, हर्षल पाटील आदी उपस्थित होते.
