Home » जळगाव » मू .जे.महाविद्यालयात रंगला “पाऊस गाणी” कार्यक्रम

मू .जे.महाविद्यालयात रंगला “पाऊस गाणी” कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू.जे.महाविद्यालयात मराठी विभाग व साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळ यांनी आयोजित केलेला ‘पाऊस गाणी’ हा गीत-संगीत-कविता-नृत्य यांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गीतगायन, काव्यवाचन, नृत्याविष्कार आणि वादन यांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात कागदी होड्या पाण्यात सोडून झाली. डॉ. अखिलेश शर्मा यांनी पर्जन्यसूक्त म्हटले. अनुरागाचे थेंब झेलती, पाऊस आला, घन घन माला, मन उधान वाऱ्याचे, नाच रे मोरा, पावसात वेडे मन मोर नाचले, या गीतांचे गायन क्रमाने रसिका ढेपे, पूजा ओझा, अनुजा मंजुळ, भाग्यश्री काळे, वर्षा जाधव, आकांक्षा कोळी यांनी केले. विद्यार्थ्यांनी ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ या कवितेचे सामूहिक गायन झाले. या कार्यक्रमासाठी संगीत विभाग प्रमुख प्रा. कपिल शिंगाणे (हार्मोनियम वादन), प्रा. देवेंद्र गुरव (ढोलक वादन), कुलदीप भालेराव (ऑक्टोपॅड), दिनेश लंगरे (सिंथेसायजर), भूषण काटोले (तबला) यांची साथसंगत लाभली.

विद्यार्थ्यांनी नामवंत कवींच्या तसेच काही स्वलिखित कविता सादर केल्या. पाऊस आला (मंगेश पाडगावकर), पहिला पाऊस (देवानंद जंजाळ), आलाय पाऊस भिजून घ्या (निलेश होडबे), थेंबा थेंबांचा पाऊस (माधव दीक्षित), पाऊसराव (संदीप खरे), आला पाऊस मातीच्या वासात ग (शांता शेळके), तू आलास आणि (सीमा विश्वास), आला पह्यला पाऊस (बहिणाबाई चौधरी), खरा तर मी भाद्रपदातला (शिवाजी सांगळे) या कवितेचे क्रमाने भाग्यश्री काळे, ऐश्वर्या पाटील ,शितल पाटील ,निलेश पाटील, गुणवंत बोरसे, रागिनी गोंड, रसिका ढेपे, सिद्धी उपासनी, जया पाटील यांनी सादरीकरण केले. प्रिय पाऊस, तू आणि पाऊस, सांजवेळी आल्या सरी या स्वरचित कवितेचे सादरीकरण राज तायडे, स्नेहल सोनवणे, तनुश्री पाटील यांनी केले.

राजेश्वरी रत्नपारखी हिने ‘अधिर मन झाले’ या गीतावर अप्रतिम बासरीवादन केले. कैवल्य बाविस्कर यानी शेतकरी बनून संवाद साधला.

ज्ञानदा कडू हिने गणेश वंदना सादर करून नृत्याला सुरुवात झाली. घन बरसे, घन घन माला, चिंब भिजलेले, अधीर मन झाले, ढगाला लागली कळ, आला आला वारा, घन ओथंबून, ढग दाटुनी, निशाणा, वादळ वारा सुटला ग, या गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले. कांचन सोनवणे, वेदिका भटमुळे, चारू पाटील, उर्मिला पाटील, गायत्री ठाकूर, गौरी जगताप, मयुरी मगरे, मोहिनी पगारे , दिव्या पाटील, नेहा जैन, प्रांजल पाटील, वैष्णवी सोनवणे, सिद्धी बेलेकर, अंजली रणदिवे, स्नेहा बेलेकर, राजेश्वरी जोगी यांचा नृत्यामध्ये सहभाग होता.नृत्य विभाग प्रमुख अजय शिंदे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.

याप्रसंगी केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, भाषा प्रशाळा संचालक डॉ. भूपेंद्र केसुर, सामाजिक शास्त्रे प्रशाळा संचालक प्रा. देवेंद्र इंगळे, मराठी विभाग प्रमुख डॉ.विद्या पाटील, साहित्य,कला व सांस्कृतिक मंडळ प्रमुख डॉ.अखिलेश शर्मा, डॉ.योगेश महाले, डॉ.विलास धनवे प्रा.विजय लोहार , डॉ.भाग्यश्री भलवतकर, प्रा. गोपीचंद धनगर ,प्रा.अतुल पाटील ,प्रा. वर्षा उपाध्ये, प्रा.रेणुका झांबरे तसेच इतर प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. वर्षा उपाध्ये यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!