Home » राजकीय » भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तर्फे राजाभाऊ वाजे यांना जाहीर पाठिंबा

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तर्फे राजाभाऊ वाजे यांना जाहीर पाठिंबा

नाशिक | दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज )– नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.

आज दिनांक ११ मे २०२४ रोजी श्रमिक नगर अशोक नगर परिसरात पक्षाच्या वतीने कामगार बंधू व कार्यकर्ते यांनी प्रचार पत्र वाटप केले. प्रचार पत्रक वाटप करताना लोकशाही वाचवा, देश वाचवा, संविधान वाचवण्याचा संदेश यावेळी सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजाभाऊ वाजे ना भरघोस मताने विजयी करा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

प्रचार पत्र वाटप करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.संजय पवार, कॉ. गौतम कोंगळे, कॉ.छाया जाधव, कॉ. कैलास पारधी, कॉ. विजय माळी, कॉ. जितू पाटील, कॉ.नामदेव पवार, कॉ. दत्तात्रय बिडकर यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!