कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एम के पवार हे आज सेवानिवृत्त झाले. त्यांनी चार वर्ष मुख्याध्यापक पदावर काम पाहिले. विद्यालयाच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मंगेश पाटील सचिव रत्नाताई पाटील उपाध्यक्ष दिनकर पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी सरांना निरोप व शाल श्रीफळ देऊन सत्कार व शुभेच्छा दिल्या. यानंतर एम के पवार यांचा सत्कार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एस एस केदार यांनी केला. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक जी टी पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सत्कार करून सरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
