आजच्या लेखात आपण प्रदुषण म्हणजे नेमके काय हे बघणार आहोत. आपण आधी ‘प्लास्टीक’ या विषयावर बोलणार आहोत. आज दिवसेंदिवस प्लास्टीकचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. प्लास्टीक नष्ट होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात. प्लास्टीक सहजपणे नष्ट होत नाही, तरी त्याचा सर्रासपणे चाललेला वापर आपण कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे. कारण प्लास्टीक हे मानवी शरीरासाठी व मुक्या प्राण्यांसाठी अतिशय धोकेदायक आहे .कारण आपण खुप अशा रोजच्या वापरातील वस्तु ह्या प्लास्टीकच्या पिशव्यांमध्ये भरलेल्याच वापरतो. एवढचं नाही तर आपण अती गरम चहा किंवा दुध काॕफी किंवा हाॕटेल पार्सल हे आपण सहज घेतो व मग काही वेळाने ते आपण सेवन करतो. तर याचा परीणाम आपल्या लाख मोलाच्या शरीरावर होतो व आपण आणि आपले कुटूंब हे आरोग्यदायी राहात नाहीत.

आपण बघत आहोत कॅन्सर हा आजार भयानक वाढत चाललेला आहे यात वय वगैरे काहीच नसते तो कुणालाही होतो, अगदी एक महीन्याच्या बाळाला देखील होतो. म्हणुन मित्रहो आपण जे आपल्या हातात आहे ते तरी निदान थांबवु शकतो. आपण ज्या पिशव्यांमधे अन्न भरुन बाहेर किंवा कचरा कुंडीत फेकतो ते अन्न आपले मुके प्राणी पिशवीसहीत खातात. जे आपल्याला अमृत समान दुध देतात, त्या प्राणी मात्रांवर तरी थोडी दया करा . कारण अन्नासोबत ह्या प्लास्टिकच्या पिशव्या देखील प्राण्यांच्या पोटात जातात . त्या पिशव्या प्राण्यांच्या आतड्यांमध्ये अडकल्याने हे प्राणी मृत पावतात. आपण त्यांच्या मृत्युचे अप्रत्यक्षपणे कारण बनु नये एवढीच विनंती आहे. आपण तर या प्रदुषणामुळे आपले आयुष्य आयुर्मान कमी करूनच घेतले आहे, पण निदान मुक्या प्राण्यांचा तरी आपण थोडा विचार केला पाहीजे .

आपण नेहमी बघतो दुकानांतुन चिप्स ,भाजीपाला किंवा किराणा वस्तू आपण घेतो ,तेव्हा आपल्याला त्या वस्तु प्लास्टिकच्या पॅकिंगमध्ये मिळतात. त्या पिशवीचा आतुन येणारा घाणेरडा वास तुम्ही घेऊन बघा, तेव्हा लक्षात येईल की आपण आपली कापडी पिशवी नेहमीच सोबत ठेवली पाहीजे आणि त्यातच भाजीपाला किंवा इतर वस्तु आणली पाहीजे. आपण बघतो की वर्षभरात आपण पाण्याच्या शेकडो बाटल्या रिकाम्या करतो. त्याचे पुनर्वसन होत नाही, असा हजारो टन कचरा हा नदी नाल्यांना जाऊन मिळतो आणि ते समुद्राला जाऊन मिळतात. ह्या प्लास्टिक मुळे जलप्रदूषण होऊन जलचर प्राण्यांचे मोठे नुकसान होते ते देखिल मृत होतात. असा हा प्रदुषणाचा भस्मासुर आपल्या प्रत्येकाने ठरवल तर आपण त्याला पराभुत करू शकतो व आपल्या पुढच्या पिढीला आपण वाचवु शकतो… बघा विचार करा.
सौ.भारती ज्ञानेश्वर कुमावत,
समांतर विधीसेवा सहायक जळगाव
समाजसेविका

असे लेख कायम वाचत राहिल्याने व त्या नुसार प्रत्यक्ष योग्य कृती केल्याने नक्कीच आपण प्राण्यांना वाचवू शकतो