Headlines
Home » जळगाव » केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात वृक्षारोपण

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात वृक्षारोपण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये महाविद्यालयाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त व ‘एक पेड माँ के नाम‘ या उपक्रमाचे औचित्य लक्षात घेऊन प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले. वाढते तापमान, प्रदूषण या समस्या जागतिक स्तरावर गंभीर होत आहेत. शुद्ध हवा, ऑक्सिजनसाठी वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनाची गरज आहे. सर्वांनी वृक्षारोपणावर भर द्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. सुगंधी यांनी केले.

वृक्षारोपण करताना महाविद्यालयातील अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, पॉलिटेक्निकचे समन्वयक डॉ. सी.एस. पाटील, प्रा.अविनाश सूर्यवंशी, प्रा.दर्शन ठाकूर, प्रा. राहुल पटेल, डॉ. वीणा भोसले, प्रा.हर्षा देशमुख, प्रा. शेफाली अग्रवाल, प्रा.अर्चना शेवाळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. विजय चौधरी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!