Headlines
Home » जळगाव जिल्हा » एरंडोल येथे प्रवासी एस टी बसला अपघात ! एका प्रवाशाचा जागीच मृत्यु !

एरंडोल येथे प्रवासी एस टी बसला अपघात ! एका प्रवाशाचा जागीच मृत्यु !

एरंडोल ( वास्तव पोस्ट ) : एरंडोल–कासोदा मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एमएच २० बी एल ३४०२ क्रमांकाच्या भडगाव कडून एरंडोल कडे जात असतांना एस.टी. बसचा अपघात झाला. यात बस थेट नाल्यात पलटी झाली. अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असून, क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अपघाताची माहीती मिळताच तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस, अँब्युलन्स आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.

दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार बस चालकाचे बस वरील नियंत्रण सूटल्याने हा अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यु झाला. तसेच १५ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्रथमोपचार करून तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.
तर ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर एरंडोल येथे प्राथमिक उपचार सुरू आहेत.

प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!