Home » क्रीडा » राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत जळगाव ची ओवी पाटील व श्रद्धा इंगळे दुहेरीच्या राज्य विजेत्या

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत जळगाव ची ओवी पाटील व श्रद्धा इंगळे दुहेरीच्या राज्य विजेत्या

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : स्व. डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा- २०२५ ही चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती. दि.१० ते १४ सप्टेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ओवी पाटील चाळीसगाव (जळगाव) व श्रद्धा इंगळे (कराड) या दोघींनी १३ वर्षा खालील दुहेरी गटात विजय प्राप्त केला. त्यांनी सेमी फायनल मध्ये हेजल जोशी व स्पृहा जोशी मुंबई उपनगर या खेळाडूंना २१-१५ व २१-१४ ने हरवत अंतिम सामन्यासाठी आपली जागा निश्चित केली.

अंतिम सामन्यामध्ये मायरा गोराडिया व कनक जलानी मुंबई यांचा २१-१४ व २१-१५ सरळ दोन सेट मध्ये पराभव करत विजय नोंदवला. त्यांना  सुवर्णपदक, ट्रॉफी, रोख रक्कम व प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ओवी चे वडील अमोल पाटील हे चाळीसगाव येथील काकासाहेब पूर्णपात्रे शाळेत क्रिडा शिक्षक असून तेच तिचे प्रशिक्षक आहेत. ओवी पाटील व अमोल पाटील यांच्या भावी वाटचालीसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व सचिव विनीत जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे व प्रशिक्षक किशोर सिंह यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान जळगाव रेल्वे स्टेशनवर जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षक दीपिका ठाकूर यांच्या सह महिला खेळाडूंनी ओवी हीचा सत्कार केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!