Headlines
Home » शैक्षणिक » मू.जे.महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू

मू.जे.महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुळजी जेठा महाविद्यालय अभ्यासकेंद्रात पदवीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष बी.ए  (मराठी माध्यम) व बी. कॉम (इंग्रजी व मराठी माध्यम) सह पदव्युत्तर पदवीच्या MBA , एम.ए-लोकप्रशासन व MSci Chemistry हे नवीन  अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.

या सर्व अभ्यासक्रमातील प्रवेशांची अंतिम मुदत ३१ जुलै २०२४ आहे. विद्यार्थ्यांनी या मुदतीच्या आत आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी महाविद्यालयातील प्रवीण बारी यांचेशी अभ्यासकेंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रप्रमुख डॉ. सं.ना. भारंबे व केंद्र संयोजक डॉ.जुगलकिशोर दुबे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!