रत्नागिरी ( वास्तव पोस्ट ) : येथे सुरू असलेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन ची निकिता दिलीप पवार हिने मुलींच्या ५५ किलो आतिल वजन गटात सुवर्णपदक पटकावुन बॅंगलोर येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात स्थान निश्चित केले, नुकत्याच झालेल्या शालेय राज्य स्पर्धेत सुद्धा तिने सुवर्णपदक पटकावले असून शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
निकिताला प्रशिक्षक जयेश बाविस्कर अजित घारगे याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले असून तिच्या या यशाबद्दल जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
