जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमधील केमिस्ट्री विषयाच्या शिक्षिका नीलिमा स्वप्निल बऱ्हाटे यांना श्री सत्यसाई विद्यापीठ अँड टेक्नॉलॉजी मेडिकल सायन्स सिहोर (मध्यप्रदेश) विद्यापीठाने पीएच. डी पदवीने सन्मानित केले आहे. त्यांनी सिंथेसिस ऑफ हायड्रोसायक्लिक कंपाउंड अँड बायोलॉजिकल एप्लीकेशन या विषयावर डॉ. सी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची, उपप्राचार्या मेघना राजकोटिया समन्वयक शशिकांत वडोदकर, संस्थेचे कोषाध्यक्ष डी.टी. पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
