Headlines
Home » राजकीय » राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा कडून चिन्ह गेले ; घरटं चोरणाऱ्यांनो उमेद कशी चोरणार …म्हणून ते आमचे साहेब आहेत

राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा कडून चिन्ह गेले ; घरटं चोरणाऱ्यांनो उमेद कशी चोरणार …म्हणून ते आमचे साहेब आहेत

मुंबई दि ७ ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे दिलं आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा झटका आहे. या निकालानंतर शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली असून शरद पवार गटाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शरद पवार गटाकडून आरोप केला जात आहे की ‘अदृश्य शक्तीने हा निकाल दिला आहे’ . शरद पवार गटाने थेट अजित पवार यांच्यावरही एका कवितेच्या माध्यमातून हल्ला चढविला आहे. घरटं चोरून नेणाऱ्यांनो, उमेद कशी चोराल? असा सवाल शरद पवार गटाने केला आहे.
शरद पवार गटाने राष्ट्रवादीच्या ट्विर हँडलवरून एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. त्यात एका तरुणाची कविता आहे. घरटं चोरून नेणाऱ्यांनो, उमेद कशी चोराल? असा सवाल या कवितेतून करण्यात आला आहे. हीच कविता शरद पवार गटाने ट्विट करून अजितदादा गटावर निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
पवार गटाने आणखी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ‘म्हणूनच ते आमचे साहेब आहेत’ शरद पवार यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ आहे. त्यावर राष्ट्रवादीने एक पोस्ट लिहिली आहे. २०२२ च्या व्हिडिओत साहेबांचं जे म्हणणं आहे ते आजही तंतोतंत तसंच आहे. कारण, त्यानंतर अनेक राजकीय वादळं आली तरीही हा मनुष्य खचत नाही, साहेबांची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे. कोणत्याही संकटाला ते आजही निधड्या छातीने सामोरं जातात, म्हणूनच ते आमचे साहेब आहेत!!, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

देवळाची जागा कुणाला जरी मिळाली…
निकाला नंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार यांना धक्का वगैरे काही वाटत नाही. देवळाची जागा कुणाला जरी मिळाली तरी आतल्या मूर्तीच अधिष्ठान हे भक्तांच्या ठाई असतं. त्याच पद्धतीने शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल ह्या दोन्हीही पक्षाचे अधिष्ठान किंवा अस्तित्व हे निवडणूक आयोगाच्या निकालावर अवलंबून नाही. पक्ष वाढवला, घडवला त्या गाव खेड्यातील कार्यकर्ते शिवसैनिकांच्या अधिष्ठानावर जास्त अवलंबून आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या दोन्हीही पक्षाचे कार्यकर्ते उद्धव साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या सोबत आहेत, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!