Headlines
Home » राजकीय » भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने नवनीत राणा यांचा प्लान बी तयार ! अमरावती लोकसभा सस्पेंस कायम

भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने नवनीत राणा यांचा प्लान बी तयार ! अमरावती लोकसभा सस्पेंस कायम

अमरावती | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजपने लोकसभा २०२४ साठी महाराष्ट्रातील २० मतदारसंघातुन उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात जुन्यांबरोबर नव्यांनाही संधी दिली आहे. परंतु काही जागांवरून महायुतीत तेढ असल्याने, त्या जागांवर भाजपने अद्याप आपला उमेदवार दिलेला नाही. येत्या एक दोन दिवसात हा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी ज्या जागांवर तिढा आहे, तेथील विद्यमान खासदार आणि इच्छुकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे.

दरम्यान या विद्यमान खासदार आणि इच्छुकांनी आपआपला प्लान तयार ठेवला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला बी प्लान तयार केला आहे. गेल्या लोकसभावेळी अमरावतीच्या नवनीत राणा अपक्ष लढुन निवडून आल्या आणि भाजपला पाठिंबा दिला होता. २०२४ ला भाजप अमरावतीची जागा आपल्याला सोडेल असं त्यांना वाटत होतं. पण भाजपने पहिल्या यादीत अमरावतीची जागा जाहीर केलेली नाही. त्यामुळे नवनीत राणा यांनी प्लान बी तयार ठेवला आहे.

इकडे मात्र अमरावतीच्या जागेसाठी शिंदे गट इच्छुक असल्याची चर्चा आहे. कारण अमरावतीवर नेहमी शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा जणुकाही हट्टच शिंदे गटाने लावला आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांनीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी घेऊन अमरावतीची जागा सोडण्याची विनंती केली आहे. मात्र, भाजपने याबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही.

नवनीत राणा या भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण जरी त्या भाजपमध्ये आल्या तरी अमरावतीची जागा आम्हालाच सोडली पाहिजे, असा आग्रह शिंदे गटाने धरला आहे. त्यामुळेच नवनीत राणा यांनी सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर भाजपमधून कमळ चिन्हावर निवडणूक न लढल्यास दुसरा पर्याय म्हणून युवा स्वाभिमान पक्षाच्या चिन्हाच्या पर्यायांची नवनीत राणांकडून चाचपणी केली जात आहे. त्यासाठी राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्षाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. या पत्रातून निवडणुकीसाठी दहा चिन्ह सूचवण्यात आले आहेत. फुटबॉल, रोडरोलर, गॅस सिलिंडर, ऑटोरिक्षा, कैची, पाना, शिट्टी, टीव्ही, बॅट, कुकर, फुटबॉल, रोडरोलर, गॅस सिलिंडर, ऑटोरिक्षा, कैची यापैकी एक निवडणूक चिन्ह म्हणून देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!