Home » जळगाव » सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा राष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन

सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा राष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई सोसायटी संचलित मू.जे. महाविद्यालय जळगाव च्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी तर्फे एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ या वेळेत करण्यात आले आहे. आधुनिक डिजीटल युगात सर्वांगीण स्वास्थ्यासाठी योगाचे महत्व या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत ही परिषद मू.जे. स्वायत्त महाविद्यालयात आयोजित केली आहे.

आधुनिक डिजिटल युगात सोशल मीडियाचा अतिवापर आणि त्याचा समाजातील सर्व स्तरावर होणारा परिणाम व त्यावर सर्वांगीण स्वास्थ्यासाठी योगाभ्यास कसा महत्त्वपूर्ण असेल याविषयीचे विचार मंथन या परिषदेत करण्यात येईल. योग परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उत्तराखंड संस्कृत विश्वविद्यालय, हरिद्वार येथील विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता आणि योग विभाग प्रमुख प्रा.डॉ. लक्ष्मीनारायण जोशी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच योग महाविद्यालय नाशिक येथील प्राचार्य डॉ. निलेश वाघ यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचबरोबर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती चे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन चे सेवानिवृत्त प्राचार्य आणि बृहन महाराष्ट्र योग परिषदेचे कार्यकारी सचिन डॉ.अरुण खोडस्कर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सदर परिषद आंतरविद्याशाखीय  असल्यामुळे विविध विषयांचे संशोधक सबंधित विषयाच्या  अनुषंगाने आपले संशोधन पेपर सादर करू शकतात. संशोधक, योगसाधक, शिक्षक, डॉक्टर्स, क्रीडाशिक्षक, क्रीडा संचालक,  समुपदेशक, संस्कृत अभ्यासक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, प्राध्यापकांनी या परिषदेत सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सं. ना. भारंबे, सोहम योग अँड नेचरोपॅथी चे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी केले आहे. परिषदेत सहभागी होण्यासाठी आपली ऑनलाईन नोंदणी दि.५ जानेवारी पर्यंत करणे आवश्यक आहे. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी सोहम योग विभाग, मू.जे. महाविद्यालय येथे संपर्क साधावा असे आयोजकांनी कळवले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!