Headlines
Home » राष्ट्रीय » ११ ऑगस्ट रोजी दोन सत्रात होणार पीजी नीट परिक्षा

११ ऑगस्ट रोजी दोन सत्रात होणार पीजी नीट परिक्षा

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने नीट-पीजी २०२४ परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा येत्या ११ ऑगस्ट २०२४ रोजी दोन शिफ्टमध्ये होणार आहे. एसओपी आणि प्रोटोकॉलचा आढावा घेतल्यानंतर नीट-पीजी परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. नीट परीक्षांमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने २२ जून रोजी नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणाऱ्या नीट पीजी परीक्षेशी संबंधित अधिक माहिती लवकरच बोर्डाच्या अधिकृत natboard.edu.in या वेबसाइटवर दिली जाईल. ज्या उमेदवारांनी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षासाठी अर्ज केला आहे आणि २३ जून रोजी परीक्षा देऊ शकले नाहीत, ते एनबीईच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नवीन परीक्षेच्या तारखेची सूचना बघू शकतात.

एनबीईचे अध्यक्ष डॉ. अभिजात सेठ हे परीक्षा रद्द झाल्यानंतर म्हणाले होते की, शिक्षण मंत्रालयाला परीक्षा पद्धतीची यंत्रणा तपासून परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची कमी नसल्याची हमी मिळवायची होती. आणि म्हणूनच परीक्षा पुढे ढकलण्यात आली. एनबीई गेल्या ७ वर्षांपासून नीट- पीजी परीक्षा आयोजित करते. परंतु, आतापर्यंत कधीच पेपर लीक झाल्याचा प्रकार घडला नाही.

नीट परीक्षेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर पीजी परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले. पेपर सुरु होण्याच्या दोन तास अगोदर प्रश्नपत्रिका तयार करण्यात येईल असा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!