Headlines
Home » महाराष्ट्र » विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न

विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न

मुंबई, दि.२१( वास्तव पोस्ट न्यूज )– विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठक आज पार पडली . आजच्या या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे २६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत घेण्याचा निर्णय घेण्यात आला . तसेच २७ फेब्रुवारीला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आण‍ि अंबादास दानवे आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!