मुंबई | दि.१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ साठी वंचितच्या पाठींब्याच्या बदल्यामध्ये कॉंग्रेसही आंबेडकरांना पाठींबा देण्याची शक्यता आहे अशी माहीती समोर येत आहे. आंबेडकरांना अकोल्यातुन पाठींबा देण्याचा कॉंग्रेसचा विचार असल्याची खबर आहे. इकडे कॉंग्रेसच्या पाठिंब्याने मविआ मध्ये वादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
बऱ्याच चर्चेच्या फैरी झाल्या नंतरही वंचित बहुजन आघाडी मविआत नाही. तरी देखील वंचितने कॉंग्रेसला ७ जागांवर पाठींबा देऊ केला आहे. कॉंग्रेसनेही वंचितने देऊ केलेल्या या पाठींब्याच्या मोबदल्यात प्रकाश आंबेडकरांना रिटर्न गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश कॉंग्रेसने अकोल्यात आंबेडकरांना पाठींबा देण्याचा विचार केला आहे. याबाबत कॉंग्रेस हायकमांडला कळविण्यात आले असल्याचे वडेट्टीवार यांनी पत्रकारांना सांगितले.
जर कॉंग्रेसला वंचितकडून लोकसभेसाठी सात जागांवर पाठींबा मिळत असेल तर अकोल्याच्या जागेबाबत पुर्नविचार व्हावा, अशी अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांची मागणी असुन आम्ही हाय कमांडला कळविले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान या सगळ्यावर उबाठाचे संजय राऊत म्हणाले की, हा कॉंग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय असुन ही बाब मविआची नाही. मात्र मविआ मध्ये या विषयावर चर्चा होईल, एवढंच मी सांगू शकतो असे राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने नापसंती दाखविली आहे. जयंत पाटील म्हणाले की महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होणार नाही. परंतु अनेकांनी काही दिवसात आमच्यात बिघाड़ी करण्यासाठी प्रयत्न केले आहे. पण ती बीघाड़ी आम्ही होऊ देणार नाही. तसेच प्रकाश आंबेडकरांकड़े कुठलेही समर्थन मागितले नसल्याचे कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी देऊ केलेला पाठींबा आणि कॉंग्रेसनेही वंचितला देऊ केलेला पाठींबा हा सगळा माइंड गेम आहे. आता ह्या माइंड गेम मध्ये विजय नेमका कुणाचा होतो ते येत्या काही दिवसांत कळणारच आहे.
