पाचोरा | दि ०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे सुरू असलेल्या शिव महापुराण कथेमध्ये आज वैशालीताई व नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली.
याबाबतचे वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील श्रीक्षेत्र हरी हरेश्वर मंदिरात सध्या शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यात हभप मंदार महाराज शास्त्री नाशिककर यांच्या सुश्राव्य वाणीतून कथेचे निरूपण करण्यात आले.
दरम्यान, आज शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी आणि नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी यांनी आज शिव महापुराण कथेला भेट दिली. पहिल्यांदा ग्रामस्थांसह आयोजकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सुर्यवंशी दाम्पत्याच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी आयोजक व ग्रामस्थांसह शिवसेनेचे जेष्ठ शिव सैनिक देवीदास पाटील,अरुण पाटील,राजा बाबू तेली,भगवान पाटील,कोमल देशमुख,भास्कर नाना,शहर अध्यक्ष भागवत पाटील,अजय भाऊ तेली,अतुल सुर्यवंशी,राहुल बडगुजर, समाधान हटकर, कमलेश मालकर, गजूपोतदार राहुल चौधरी,तेजस पाटील,प्रीतेश जैन,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
