जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू.जे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग, साहित्य भारती, जळगाव व वैश्विक संस्कृत मंच नाशिक क्षेत्र यांच्या वतीने कालिदास जयंतीचे औचित्य साधून एक दिवसीय राष्ट्रीय संगोष्ठीचे आयोजन तसेच कालिदासाच्या साहित्यवर विशेष व्याख्यानाचे आयोजन मू.जे.च्या नवीन कान्फ्रेस हॉल या ठिकाणी दि.२४ मंगळवार रोजी सकाळी १०:०० वाजता करण्यात आले आहे.
वैश्विक संस्कृत मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेश कुमार मिश्र (महा नालंदा विहार संस्कृती मंत्रालय भारत सरकार) यांचे या निमित्त व्याख्यान होणार आहे. तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त साहित्य रसिकांनी भाग घेऊन कार्यक्रमाचे आनंद घ्यावे ही अशी विनंती प्रा. भाग्यश्री भलवतकर, डॉ.सुभाष महाले, डॉ. अखिलेश शर्मा यांनी केली आहे.
