जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदान टक्केवारी वाढण्यासाठी जळगाव शहर विधानसभा मतदार संघात स्वीप नोडल अधिकारी तथा मनपा सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, अभियंता प्रकाश पाटील, योगेश बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली दि.८ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत.

आज दि.१३ नोव्हेंबर रोजी ओरियन स्टेट बोर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी पत्र लिहून आपल्या पालकांना मतदानाचे महत्व पटवून देत मतदान करण्याचा आग्रह केला. याप्रसंगी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी ‘विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र’ या उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे प्राचार्य श्रीधर सुनकरी, उपप्राचार्या रजनी गोजोरेकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
