जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अंतरंग २के२५ स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी स्नेहसंमेलन म्हणून व्यसपीठ उपलब्ध केले आहेत असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी स्नेहसंमेलनाच्या प्रास्ताविकात केले.
महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सुविधा, रोजच्या धकाधकीच्या जीवनात असलेले योगाचे महत्व, महत्वाकांक्षा व प्रेरणा, शिस्त अश्या विविध विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी महत्व सांगितले. व्यासपीठावर उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ‘अंतरंग’, प्राध्यापकांचे संशोधन पेपर ‘आयजेआरडी’, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे ‘कार्यक्षम’ अश्या विविध स्मरणिकांचे प्रकाशन करण्यात आले.
स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. शिल्पा बेंडाळे, कोषाध्यक्ष डी.टी. पाटील, संचालक शशिकांत वडोदकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. सी.एस. पाटील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा. गणेश पाटील, आय क्यू ए सी समन्वयक प्रा.कल्पेश महाजन, एचआर विभाग प्रा. श्रुतिका घरडे, प्रा.हर्षा देशमुख, डॉ.वीणा भोसले, प्रा.डिगंबर सोनवणे, प्रा.प्रवीण भंगाळे, प्रा. अविनाश सूर्यवंशी, प्रा. के.बी. पाटील, प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. राहुल पटेल, प्रा.मनीष महाले प्रमुख मान्यवर म्हणून लाभले.

स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण खान्देशी रील स्टार व गायक अशोक पाटील व सोनाली जाधव होते. आझाद केलंय पाखरा व विविध अहिराणी गाण्यांवर या खान्देशी रील स्टार अभिनेत्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना थिरकवले. विद्यार्थ्यांनी अहिराणी गाण्यावर नृत्य करून मनमुराद आनंद घेतला. ट्रॅडिशनल डे, ग्रुप डे, फिल्मी डे, साडी व टाय डे, बॉलीवूड, हॉरर, बॅक टू स्कूल डे, सोलो सॉंग, सोलो डान्स, गृप डान्स, ड्रामा, रॅम्प वॉक फॅशन शो, क्रिकेट, रांगोळी, मेहंदी अश्या विविध स्नेहसंमेलनाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी मुलींनी आकर्षक साडी परिधान करून व मुलांनी टाय लावून रॅम्प वॉक केला. अंतिम परीक्षेत व अविष्कार स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच फॅशन शो करिता अर्चना जाधव (मेकअप आर्टिस्ट जळगाव) म्हणून परीक्षक लाभले व फॅशन शो मधील विजेते स्पर्धकांना त्यांचे हस्ते विजेते पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुषी ओचानी, सिद्धी शिंपी, पूर्वा पाटील, यज्ञेश बारी तर आभार प्रदर्शन प्रा. हर्षा देशमुख यांनी केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे विद्यार्थी प्रतिनिधी निखिल पाटील व श्वेता चौधरी, विद्यापीठ प्रतिनिधी नेहा पोळ उपस्थित होते. तर अंतरंग २ के२५ स्नेहसंमेलनाचे प्रमुख समन्वयक प्रा. सचिन नाथ होते .
