जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक जीवनात पुरुषांप्रमाणेच महिलांचे योगदान देखील मोलाचे असते. परंतु अनेक ठिकाणी पुरुषांसारखे समान अधिकार महिलांना दिले जात नाहीत.
समाजासाठी महिलांनी दिलेल्या योगदानाचं महत्त्व समजण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना समान अधिकार देण्याच्या उद्देशाने दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. समाजकारण, राजकारण, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रांत महिलांनी आतापर्यंत जी प्रगती केली आहे, ती साजरा करण्यासाठीच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व विषद केले. या प्रसंगी महाविद्यालयातील महिला प्राध्यापक यांनी अंताक्षरीचे विभागीय आयोजन केले होते. त्यात प्रा. हर्षा देशमुख अँड ग्रुप यांनी विजेतेपद पटकावले. प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. स्नेहा पाटील, प्रा. रश्मी बहिरुणे, प्रा.निलेश महाजन, प्रा. डिगंबर सोनवणे यांनी महिला दिनानिमित्त महिलांमध्ये असलेली जागरूकता, समानता, एकता या विषयी महत्व विषद केले.
यावेळी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा.गणेश पाटील यांनी ग्रामीण भागातील महिलांचं सबलीकरण, आदर, सन्मान करण गरजेचं आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. सी.एस. पाटील, आयक्यूएसी समन्वयक प्रा. कल्पेश महाजन, एचआर विभाग प्रमुख प्रा. श्रुतिका घरडे, इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट तसेच पोलिटेकनीक प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
