Home » जळगाव » मु.जे. महाविद्यालयात इन्स्ट्रूमेंटल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

मु.जे. महाविद्यालयात इन्स्ट्रूमेंटल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुळजी जेठा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने दि.२४ आणि २५ फेब्रुवारी, २०२५ रोजी विद्यापीठस्तरीय दोन दिवसीय इन्स्ट्रूमेंटल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आय.क्यू.ए.सी. संचालक डॉ. केतन नारखेडे अध्यक्ष म्हणून लाभले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी Infra- Red (IR) spectroscopy, Atomic Absorption spectroscopy (AAS), UV-Visible spectroscopy and Gas chromatography (GC) विषयी व्याख्याने तसेच प्रात्यक्षिके घेण्यात आली.

सदर कार्यक्रमास विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. संपूर्ण कार्यक्रमासाठी प्राचार्य सं.ना. भारंबे व  विभागप्रमुख डॉ. योगेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन सोनल उपलपवार व डॉ. जयश्री भिरूड यांनी केले. डॉ. राजेंद्र. पाटील, डॉ. मनोज पांडे, डॉ. वसीम शेख,  डॉ. राहुल महीरे, प्रा. संदीप पाडवी तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ कमलाकर हरी आमोदकर सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!