Headlines
Home » जळगाव » शकुंतला माध्यमिक विद्यालयात पोक्सो कायद्याविषयी माहिती

शकुंतला माध्यमिक विद्यालयात पोक्सो कायद्याविषयी माहिती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि.९ सोमवार रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच ज्ञानभारती फाउंडेशन जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने काउंसेलर भारती कुमावत यांनी पोक्सो कायदा तसेच गुड टच आणि बॅड टच विषयी तसेच आंतररास्टी्य साक्षरता दिवस या विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

यावेळी विविध कायदे तसेच देशातील विविध बाल अत्याचार याविषयीचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विदयालयच्या मुख्याध्यापिका आर.एन. महाजन होत्या. याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ए.ए. सुरवळकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!