पाचोरा | दि.८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील गाळण येथील शिवबा लॅबोरेटरीचा शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. गाळण येथील ओम बोरसे यांनी रक्त, लघवी आदींच्या माध्यमातून विविध विकारांचे निदान करण्यासाठी शिवबा पॅथोलॉजी लॅबोरेटरी सुरू केली आहे.
आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते या पॅथोलॉजी लॅबोरेटरीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी ओम बोरसे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतांनाच या लॅबच्या माध्यमातून परिसरातील रूग्णांना सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन केले.

याप्रसंगी शिवसेना पदाधिकार्यांसह गाळण बुद्रुकचे सरपंच राजेंद्र सावंत, गाळण खुर्द येथील सरपंच सतीश जाधव, हनुमानवाडीचे सरपंच आत्माराम राठोड, विष्णू नगरचे सरपंच रमेश राठोड, या गावांचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील डॉ बी. बी. राजपूत, राजूभाऊ काळे, डॉ. योगेश पाटील, शेखर पाटील, देविदास पाटील, डॉ उमेश पांढरकर, रोहन राजपूत, ओम बोरसे गाळण खुर्द येथील अनिल आबा व सर्व आजी-माजी सरपंच व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
