भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन अंतर्गत एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट यांच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा यासाठी शहरात कलाम सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
शहरातील शांतीनगर मध्ये देवगिरी इन्स्टिट्यूट मध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व गणिताची भीती दूर व्हावी तसेच नवनवीन संकल्पना अंगीकरावी यासाठी हर घर बालकलाम या प्रोजेक्ट अंतर्गत कलाम सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक प्रदीप सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे शरद पाटील, कास्ट्राईब संघटनेचे समाधान जाधव, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जे.पी. सपकाळे, डॉ. संजीव भटकर, भुसावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रदीप सोनवणे, बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, देवगिरी इन्स्टिट्यूट चे संचालक एस.जे. राय, आर.आर. धनगर विज्ञान मंडळाचे योगिता झांबरे, वंदना भिरुड, नीलिमा पाटील, भोजराज लोखंडे, धीरज चौधरी, सुभाष पाडवी, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे सचिव प्रशांत सोनवणे, संचालक तुळशीराम सोनवणे, ज्ञानेश्वर मोझे, दीपक गुळवे, अमितकुमार परखड यांच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी बोलताना नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स सायंटिस्टचे नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील यांनी सांगितले की, या सेंटरच्या माध्यमातून दर रविवारी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकावर आधारित विविध प्रयोग करून घेतले जातील. त्यासाठी कीट तयार करण्यात आले आहे. विद्यार्थी वैज्ञानिक संकल्पना समजून घेतील व नावीन्यतेचा शोध घेतील. सेंटरच्या माध्यमातून तज्ञ मार्गदर्शकाच्या मदतीने विद्यार्थ्याच्या मनात असलेली भीती दूर केली जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा पाटील यांनी तर आभार वनिता अग्रवाल यांनी मानले.
वैज्ञानिकांची होणार भेट
सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विज्ञानात काम करणाऱ्या विविध तज्ञ मार्गदर्शक तसेच वैज्ञानिकांची भेट घालून त्यांच्यासोबत गप्पा मारण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थी स्वतः प्रात्यक्षिकातून वैज्ञानिक संकल्पना समजून घेतील. तसेच समाजाची गरज व संशोधन याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न असणार आहे.
