Headlines
Home » जळगाव » मू .जे. महाविद्यालयात ‘भारत एक खोज’ या मालिकेचे विद्यार्थ्यांसाठी प्रसारण

मू .जे. महाविद्यालयात ‘भारत एक खोज’ या मालिकेचे विद्यार्थ्यांसाठी प्रसारण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू.जे. महाविद्यालयात सोहम हॉल मध्ये ‘भारत एक खोज’ या मालिकेतील विविध भागांचे सादरीकरण केले गेले. हा कार्यक्रम समाजशास्त्र विभाग, फिल्म क्लब आणि हेरिटेज क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. यामध्ये ‘भारत एक खोज’ या ऐतिहासिक मालिकेचे भाग दाखविण्यात आले .

या मालिकेवर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. जुगलकिशोर दुबे (संचालक, फिल्म क्लब), डॉ.उज्ज्वला भिरूड (संचालक, हेरिटेज क्लब) व डॉ. सागर बडगे (समाजशास्त्र विभाग प्रमुख) हे उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मालिकेमागील ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच त्यातील घडामोडीबद्दल सविस्तर माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी मालिका व चित्रपट हे फक्त मनोरंजन म्हणून न बघता त्यांचे मध्यवर्ती आशय जाणून घेणे महत्वाचे असल्याची माहिती दिली. मनोरंजनासोबत ज्ञानात भर कशी टाकता येईल? हे समजून सांगितले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.हर्षा महाजन यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!