Home » आरोग्य » ‘ग्लॅम अँड ब्युटी स्पा’ चे वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते उदघाटन

‘ग्लॅम अँड ब्युटी स्पा’ चे वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते उदघाटन

भडगाव | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अतिशय अद्ययावत सुविधांनी युक्त असणार्‍या ‘ग्लॅम अँड ब्युटी स्पा’ या ब्युटी शॉपीचे उद्घटान शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते जागतिक महिला दिनी खास महिलांसाठी असणार्‍या आदिती ‘ग्लॅम अँड ब्युटी स्पा’ या ब्युटी शॉपचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शॉपच्या संचालिका दीपा सुर्यवंशी आणि संगीता जाधव यांच्या वतीने वैशालीताई यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, ब्युटी सलून हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. विशेष करून कोरोनाच्या काळात याचे महत्व हे सर्वांनी अनुभवले आहे. शरीराला मेंटेन करण्याची आवश्यकता असते. याचा विचार करता पार्लर हे गरजेची बाब आहे. ‘ग्लॅम अँड ब्युटी स्पा’ हे अतिशय सुंदर असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. तर माऊली फाऊंडेशनच्या माध्यमातून या कुटुंबाने घेतलेले व्रत हे देखील अतिशय उत्तम असल्याचे वैशालीताई म्हणाल्या.

या कार्यक्रमाला योजना ताई पाटील, पुष्पाताई परदेसी, मीना बाग, रीना पाटील, सह सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवरांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!