Home » जळगाव » लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव येथे अशोक जैन यांनी केले सपत्नीक मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव येथे अशोक जैन यांनी केले सपत्नीक मतदान

जळगाव | दि. १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. आज १३ मे रोजी महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात निवडणुका होत आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघात जैन इरिगेशन्स सिस्टिम लिमिटेड चे चेअरमन अशोक जैन यांनी पत्नी ज्योती जैन यांच्यासोबत आज सकाळी ७:०० वाजता ओरियन स्कूल येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

आज नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ मतदारसंघात नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. देशाच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी आपल्याला मतदानाच्या माध्यमातून मिळत असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!