Home » जळगाव » झांबरे विद्यालयात हरिपाठ अन् रिंगण सोहळा

झांबरे विद्यालयात हरिपाठ अन् रिंगण सोहळा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त हरिपाठ पठण करण्यात आले. तर विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा साजरा केला. मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी व ग्रंथ पूजन करण्यात आले.

याप्रसंगी चंद्रभागेच्या तिरी ,विठ्ठला विठ्ठला , जय जय राम कृष्ण हरी या अभंगांचे गायन करण्यात आले. तर रखुमाई रखुमाई, माऊली माऊली, चल ग सखे पंढरीला… अशा गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. ‘वारी एक संपन्न अनुभव’ या विषयी ज्येष्ठ शिक्षक निर्मल चतुर यांनी मनोगत व्यक्त केले. ज्यांनी पंढरपूरची वारी केलेली आहे, त्यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन केले.

सूत्रसंचालन पराग राणे यांनी केले. यशस्वितेसाठी संगीत शिक्षक प्रवीण महाजन, वर्षा चौधरी, सुचिता बावस्कर आर.एन. तडवी, इ.पी.पाचपांडे, सी.बी.कोळी, विवेक मोरे, रोशनी कोळी यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!