Home » जळगाव » पाचोर्‍यात हनुमान भक्तीचा जागर ! उध्दव ठाकरेंच्या वाढदिवशी सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण

पाचोर्‍यात हनुमान भक्तीचा जागर ! उध्दव ठाकरेंच्या वाढदिवशी सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण

पाचोरा (वास्तव पोस्ट न्यूज ) : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाचोर्‍यात भव्य सामूूहिक श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात हजारो पाचोरेकांनी उत्साहात सहभाग घेतला.

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाचोरा-भडगाव मतदारसंघात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील सर्वात भव्य व लक्षवेधी कार्यक्रमाचे पाचोर्‍यातील श्रीराम मंदिराच्या परिसरात आयोजन करण्यात आले. आज सकाळी वैशालीताई आणि नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते प्रभू श्री रामचंद्र आणि श्री हनुमान यांचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी उध्दव ठाकरे साहेब पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होवोत, आणि त्यांना निरामय दीर्घायु मिळो अशी प्रार्थना करण्यात आले.

यानंतर सामूहिक श्री हनुमान चालीसा कार्यक्रम पार पडला. उपस्थित असंख्य बालवृध्दांच्या मुखातून जय हनुमान ज्ञान गुन सागर. . .असे स्तवन सुरू होताच परिसरातील वातावरण भक्तीमय बनले. सामूहिक पठण झाल्यानंतर उपस्थितांना लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जोरदार जयघोष देखील करण्यात आला.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लाभली. यात महिलांचे प्रमाण लक्षणीय असे होते. या सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते; युवासेना, महिला तसेच विविध विविध आघाड्यांचे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!