जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा विद्यालयात गुरुपौर्णिमा माता आणि पिता यांचे पूजन करुन उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुष्पा जाधव या पालकांच्या हस्ते गुरुवर्य महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आई व वडिलाचे पाय धुऊन, पूजन केले. तसेच त्यांचे औक्षण देखील केले. प्रसंगी कार्यक्रम सुरु असतांना इयत्ता दहावीतील निलम जाधव या विद्यार्थीनीने गुरूंचे महत्व सांगणारे गीत सादर केले. त्याचप्रमाणे योगिनी ठाकूर इयत्ता नववी या विद्यार्थीनीने गुरूंचे महत्व सांगणारे वक्तव्य सादर केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतिभा सुर्यवंशी यांनी गुरुविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी गुरूंचा श्लोक म्हणून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीष जाधव यांनी तर आभार रत्ना चोपडे यांनी मानले.
