Headlines
Home » जळगाव » पक्षप्रवेश : भडगाव तालुक्यातील १२० तरूणांचा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

पक्षप्रवेश : भडगाव तालुक्यातील १२० तरूणांचा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

भडगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला धडाका कायम ठेवत आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात तालुक्यातील तीन गावांमधील १२० तरूणांनी प्रवेश घेतला असून वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी या सर्वांचे स्वागत केले.

परिवर्तनाचा नारा बुलंद करत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेला साद घातली असून त्यांना भरभरून प्रतिसाद लाभत आहे. तर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यरत पदाधिकारी आणि त्यात देखील विशेष करून तरूण वर्ग हा मोठ्या संख्येने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेत आहे. यातच आता भडगाव तालुक्यातील बांबरूड प्र. बहाळ, रोकडा फार्म आणि गुढे या गावातील १२० तरूणांनी आज पक्षात प्रवेश घेतला.

पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी पक्षात प्रवेश घेतलेल्या तरूणांचे स्वागत करत त्यांना आगामी निवडणुकीत पक्षाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सक्रीय राहण्याचे आवाहन करतांनाच आपण त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे असल्याची ग्वाही देखील दिली. या प्रवेशामुळे परिसरात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ताकदीत वाढ झाल्याचे मानले जात आहे.

याप्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील, तालुका प्रमुख जे.के. पाटील, योजना पाटील, रतन परदेशी, डी.डी. पाटील, माधव जगताप, चेतन रंगनाथ पाटील, चेतन पाटील, भैय्या सुर्यवंशी, पप्पू राजपूत, नवल राजपूत, भूषण देवरे, प्रथमेश गायकवाड, रितेश महाजन, किशोर पाटील, यश बिरारी, दिक्षात सोनवणे, सनी पाटील, रोनीत अहिरे, संदीप ठाकरे, रितेश महाजन आदींची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!