पंढरपुर ( वास्तव पोस्ट ) : कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी येथील विठ्ठलाच्या मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब शासकीय महापूजा केली. यावेळी नांदेडच्या हिमायतनगरमधील पोटा गावचे रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर हे मानाचे वारकरी शासकीय महापूजेला बसले. तसेच यावर्षी प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील दोन मुलांना शासकीय महापुजेमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. पूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने तुळशीची माळ घालून उपमुख्यमंत्री शिंदे यांना सन्मानित करण्यात आले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात सध्या शेतकऱ्यांना आस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. नोव्हेंबर महिना आला तरीही पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजाला सुखी, समाधानी, आनंदी ठेव, त्यांच्यावरील सर्व संकटे दूर कर एवढेच साकडे विठुरायाच्या चरणी घातले.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश शिंदे तसेच श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचे विश्वस्त गहिनीनाथ महाराज औसेकर, पदाधिकारी आणि माझे सहकारी मंत्री जयकुमार गोरे, भरतशेठ गोगावले, प्रशासकीय अधिकारी आणि वारकरी बंधू भगिनी
