Home » राष्ट्रीय » 20 कोटी नवीन मतदारांसाठी, ‘ माझे पहिले मत देशासाठी ‘ मोहीम झाली सुरु

20 कोटी नवीन मतदारांसाठी, ‘ माझे पहिले मत देशासाठी ‘ मोहीम झाली सुरु

नवी दिल्ली | दि.०१ (वास्तव पोस्ट न्यूज ) – देशात लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) पुढील महिन्यात अधिसूचना जारी करू शकतो. निवडणुकीच्या तयारीसोबतच यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोगाने तरुणांमध्ये आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत.

देशासाठी माझे पहिले मत, मोहीम झाली सुरु :
१८ व्या लोकसभेच्या स्थापनेसाठी देशात २० कोटी नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. या मतदारांना डोळ्यासमोर ठेवून आयोगाने ‘मेरा पहला वोट-देश के लिए’ हे अभियान सुरू केले आहे. २८ फेब्रुवारी ते ०६ मार्च या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

व्हिडिओ अँथमही केले लॉंच –
मेरा पहला वोट देश के लिए…अभियान को सफल बनाने के लिए, एक व्हिडिओ गीत देखील लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होऊन पहिल्यांदाच मतदारांना लोकशाहीचे महत्त्व कळेल.

मतदार हेल्पलाइन ॲप :
निवडणूक आयोगाने तरुणांसाठी व्होटर हेल्पलाइन ॲप देखील सुरू केले आहे. युवा मतदार हे ॲप डाउनलोड करू शकतात. त्यात निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

युवा उपक्रम : मतदारांना आकर्षित करण्यासाठी आयोग युवा उपक्रमांनाही प्रोत्साहन देत आहे. मैदानावरील शारीरिक कार्यक्रमांव्यतिरिक्त, MyGov प्लॅटफॉर्मवर स्पर्धा आयोजित केल्या जातील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!