जळगाव ( जळगाव ) : भारताचे ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह संविधानाचे व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय शिक्षण समिती सदस्य युवा नेते बापु पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सरपंच पती सुदाम वाघ, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष हनिफ शेख, शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष वाल्मीक दाभाडे, सदस्य जितेंद्र पाटील, गणेश तेली, सद्दाम तडवी, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र शेलार, आयुब तडवी, गोविंद परदेशी, नामदेव दाभाडे, लोटन बनसोडे,नवाब शेख, एकनाथ बनसोडे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भाषणेही केली. खडकदेवळा खुर्द गावातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी विविध घोषणाही देण्यात आल्या. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी खडकदेवळा खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्याक शरद पाटील सह शिक्षक अजित चौधरी, भारती खैरनार, संध्या पाटील या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
