Home » शैक्षणिक » अखेर प्रतिक्षा संपली, बारावीचा निकाल उद्या लागणार

अखेर प्रतिक्षा संपली, बारावीचा निकाल उद्या लागणार

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उद्या म्हणजेच २१मे ला बारावीचा निकाल लागणार असल्याची घोषणा केली आहे. यंदा राज्यामध्ये तब्बल १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने काढलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे की २१ मे २०२४ ला दुपारी एक वाजता बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

निकाल पाहण्यासाठी मंडळाने संकेतस्थळांची यादी दिली आहे. यासोबतच यावेळी निकालाची प्रत डिजिलॉकरमध्येही जतन करता येणार असल्याचं मंडळाने म्हटलं आहे.

◆ अधिकृत संकेतस्थळांवर बारावीचा निकाल पाहू शकतात.
१) mahresult.nic.in
२) http://hscresult.mkcl.org
३) www.mahahsscboard.in
४) https://results.digilocker.gov.in
५) http://results.targetpublications.org

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!