Headlines
Home » जळगाव » राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेत एकलव्य स्क्वॅश अकॅडेमीची १२ पदकांची कमाई

राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेत एकलव्य स्क्वॅश अकॅडेमीची १२ पदकांची कमाई

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने ११ ते १५ जून २०२५ या कालावधीत महाराष्ट्र स्टेट स्क्वॅश अकॅडेमी, उंड्री, पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट इंटर डिस्ट्रिक्ट स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत एकलव्य क्रीडा संकुल संचलित एकलव्य स्क्वॅश अकॅडेमीच्या खेळाडूंनी उज्वल कामगिरी करत विविध गटांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली. एकलव्य क्रीडा संकुल संचलित एकलव्य स्क्वॅश अकॅडमीच्या खेळाडूंनी विविध वयोगट व गटांमध्ये एकूण ११ पदकांची कमाई केली. यात १ सुवर्ण, १ रौप्य व ०९ कांस्य पदकांचा समावेश असून हा अकॅडेमीसाठी व जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

पदक विजेते खेळाडू :
सुवर्ण पदक :
सिद्धांत शर्मा- U-13 Singles (Boys)
रौप्य पदक : ईशा देशपांडे- U-17 Singles (Girls)
कांस्य पदक : यश हेमनानी- U-15 Singles (Boys)
मिताली पवार- U-17 Singles (Girls)
ख़ुशी सोनवणे, अस्मि तिवारी, पायल पाटील, हर्षिता पाटील, युक्ता पाटील- U-19 Team (Girls)
राजश्री चौधरी व रिद्धी शाह- Open Doubles (Women)

या खेळाडूंना डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर ( प्रशासकीय अधिकारी-एकलव्य क्रीडा संकुल ) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक प्रा. प्रवीण कोल्हे यांनी उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले. सातत्याने खेळाडू घडवणारी ही अकॅडेमी आता राज्यस्तरावर आपली वेगळी छाप पाडत आहे.

खेळाडूंच्या या यशाबद्दल के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशनचे सचिव तसेच एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशनचे अध्यक्ष हर्षल चौधरी, उपाध्यक्ष सचिन महाजन, सहसचिव डॉ. रणजीत पाटील व प्रशिक्षक प्रा. प्रवीण कोल्हे यांनी सर्व विजेत्या व सहभागी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “एकलव्य स्क्वॅश अकॅडेमी ही जिल्ह्यातील स्पर्धात्मक स्क्वॅशला नवी दिशा देत आहे. या यशामुळे नव्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण होईल,” असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!