जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला.
पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य अंतर्गत कथाकथन, रिड टू लीड, चार्ट मेकिंग, हँड पेंटिंग, मास्क मेकिंग, टॉय मेकिंग असे उपक्रम राबविले. दुसऱ्या दिवशी पायाभूत सुविधा व संख्याज्ञान अंतर्गत अल्फाबेटीकल गेम, नंबर गेम उपक्रम घेतले. तिसऱ्या दिवशी क्रीडा दिवस साजरा करताना विटी दांडू, आट्या पाट्या, लगोरी, लंगडी, नदी-पर्वत अशा विविध स्पर्धा घेतल्या. चौथ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत फॅशन शो, कीर्तन, समूहगीत, पथनाट्य, एकांकिका, समूह गायन आदी कार्यक्रम झाले.

पाचव्या दिवशी कौशल्य विकास तथा तंत्रज्ञान दिवशी भूमिका अभिनय, मॉप मार्केटिंग, सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती स्थळे यांची माहिती सांगण्यात आली. सहाव्या दिवशी शालेय पोषण व इको क्लब उपक्रम अंतर्गत नावाचे फलक लावणे, वृक्षारोपण करण्यात आले. सातव्या दिवशी समुदाय समूह दिवस विविध उपक्रमांची मांडणी करण्यात आली. या वेळी प्राचार्य श्रीधर सुनकरी, उपप्राचार्या रजनी गोजोरेकर आदी उपस्थित होते.
