जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) च्या तत्त्वज्ञान विभागाच्या विभागप्रमुख डॉ. रजनी सिन्हा यांची अखिल भारतीय दर्शन परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अखिल भारतीय दर्शन परिषदेचे ६९ वे अधिवेशन झारखंड येथील रांची विद्यापीठात संपन्न झाले. यावेळी झालेल्या आमसभेत परिषदेच्या कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. यात सर्व समंती ने डाॅ. रजनी सिन्हा यांना उपाध्यक्ष निवडण्यात आले.
परिषदेला देशभरात तत्त्वज्ञान क्षेत्रात सर्वाधिक आजीवन सदस्य असलेली परिषद म्हणून मान्यता आहे. सद्य स्थितीत परिषदेचे तीन हजार आजीवन सदस्य आहेत. देशभरात १९५४ पासून प्रत्येक राज्यात विस्तारित आणि गतिशील संस्था आहे. डॉ.रजनी सिन्हा यांची उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे आणि मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. संजय भारंबे यांच्यासह सहकारी प्राध्यापक यांनी शुभेच्छा दिल्या.

आदरणीय मैम को हार्दिक शुभकामनाएं।