Home » सामाजिक » कजगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती नियोजन उत्सव समिती अध्यक्षपदी नितीन मोरे यांची निवड

कजगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती नियोजन उत्सव समिती अध्यक्षपदी नितीन मोरे यांची निवड

कजगाव | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नियोजनाच्या उत्सव समितीची निवड करण्यात आली.
दि.१४ रोजी दरवर्षीप्रमाणे मोठया उत्साहात साजरी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे नियोजन यंदाही करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भीम सैनिकांची व ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली.

त्यात नियोजन समितीच्या अध्यक्षपदी नितीन मोरे, उपाध्यक्षपदी राहुल सोनवणे, सचिवपदी आकाश सोनवणे यांची निवड करण्यात आली. तसेच खजिनदार संदेश खरे, उपखजिनदार भिमराज सोनवणे, सहसचिव प्रदीप मोरे, कार्याध्यक्ष विपुल खैरे, सल्लागार रमेश सोनवणे, गौतम सोनवणे,चंद्रमणी सोनवणे, विश्वनाथ अहिरे, संजय खैरे, विनोद निकम,विकास निकम, वाल्मिक खैरनार यांची निवड करण्यात आली.

सदरील बैठकीत आगामी काहि दिवसांनी येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती बाबत चर्चा झाली. तसेच आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला. प्रसंगी भिम नगर, पंचशील नगर, माता रमाई नगर व गावातील विविध भागांतील असंख्य ग्रामस्थ व भिमसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!