जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजिंदरसिंह खुराणा ( नागपूर) हे दि.३ ऑगस्ट रोजी ऑफिशियल क्लब व्हिजिटसाठी जळगावात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरात दिवसभर विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
खुराणा यांच्या मुख्य उपस्थितीत महाबळमधील टोके शाळेत रेन वॉटर हार्वस्टिंगचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यांच्या हस्ते विवेकानंद नेत्र हॉस्पिटलमध्ये आयोजित गरजू रुग्णांच्या केट्रेक्ट शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ होईल. के.के.सैफी हॉस्पिटलमध्ये कानांच्या रुग्णांची मोफत तपासणी आणि श्रवण यंत्र वाटप शिबीर होणार आहे.
तसेच ते पदाधिकाऱ्यांना मायादेवीनगरातील रोटरी हॉलमधील कार्यक्रमात रात्री ८ वाजता मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाशसिंह अग्रवाल आणि सचिव संजयकुमार तापडिया यांनी दिली.
